About Our Founders

You are here:
  • Home
  • About Our Founders

About Our Founders

र.बा. केळकर (नाना) सरांचा जन्म 22 मे 1902 साली सिंदखेडे (प.खन्देश) येथे झला. वडील फौजदार असल्याने सतत बदल्या होत असत. वडिलांकडून वयाच्या चौथ्या वर्षापासून गेरुने धूळ पतीवर चित्रे. काढण्याचे शिक्षण मिळाले. 1924-25 ते 1932 पर्यंत साने गुरुजी व माधव जुलियन हे उच्च दर्ज्याचे शिक्षण त्यांना लाभले. हे प्रखर संस्कार म्हणजेच नानांचे शैक्षणिक ज्ञान भांडवल. नानांचा चित्रकला व व्यंगचित्राचा अभ्यास व सराव उपलब्ध असलेल्या नानाविक मासिके, पुस्तके व वर्तमानपत्रांच्या आधारे चालू होता. 1925 साली इंटरमेजीएट ड्रॉयिंग ग्रेड परीक्षेत नानंना नेचर या विषयात बक्षीस प्राप्त झले व तेव्हापासून त्यांच्या कला कारकिर्दीस प्रसिद्धी सुरू झाली. 1929 साली मुंबई विद्यापीठ मॅट्रिक उत्तीर्ण होऊन चित्रकला विषयात मुंबई इलाख्यात पहिला क्रमांक मिळवला.

अहमदनगर येथील जवळपासच्या गोरगरीब मुलांना कलेचे उकचा शिक्षण व परीक्षेसाठी पुण्या-मुंबईलाच जाणे अगत्यचे होते. त्यामुळे 1966 साली नाना निवृत्त झल्यावर नानांनी पुण्यामुंबईच्या तोडीचे कलाशिक्षण अहमदनगर येथे देण्यासाठी कला महाविद्यालय काढण्याच्या हालचाली सुरू केल्या. बिशप ऑफ नासिक र.रेव्ह. ल्यूथर साहेब, सी. एम. हणबर्हट्टि साहेब व र. बा. केळकर ह्या त्रिमुर्तींनी मिळून र.ब. केळकर प्रचार्या असलेल्या प्रगतकला महाविद्यालयाची स्थापना 1 ऑगष्ट 1966 रोजी केली. नानांनी 1973 पर्यंत प्रगतकला महाविद्यालायाला प्रगत करून पुढील प्रगती कडे वाटचाल करण्यास तयार करून दिले. प्रगतकलेला प्रचार्या म्हणून द.गो. कामळे, पी. के. चव्हाण, सुरेश लोंढे, घनश्याम घोडके, संजय काळे लाभले. नशीबाने परगत कला महाविद्यालयची इमारत व प्रांगण खूप प्रशस्त आहे. मग अशा प्रकारे नानांनी आपले सर्वस्व प्रगत कला महाविद्यालयासाठी खर्ची केले.

प्रगतकला महाविद्यालय नाशिक डायोसीसन काउन्सिल पि. टी. आर. डी. टू. - नाशिक यांचे मार्फत चालवीलेले असून हे अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव शासन मान्य व अनुदानीत चित्रकला महाविद्यालय आहे.
सध्या या संस्थेचे रअ. रेव्ह. डॉ. प्रदीप कांबळे (बिशप ऑफ नासिक) अॅडव्टॉक चेअरमन आहेत. जगप्रसिद्ध शिल्पकार श्री.प्रमोद कांबळे हे मानद संचालक म्हणून महाविद्यालयास मार्गदर्शन करत असून सध्या प्रभारी प्राचार्य म्हणून प्रा. नुरील भोसले कार्यरत आहे. या सर्वांच्या मार्गदर्शनात संस्था प्रगती पाठावर आहे

About Pragat Kala

R.B. Kelkar (Nana) was born on 22 May 1908 at Sindkheda. Bishop of Nashik R.Rev Luther Sir, C.M. Hanbarhatti Sir and R.B. Kelkar established Pragatkala Mahavidyalaya on 1st August 1966. Rt. Rev.Dr. Pradip L. kamble is Adhoc Chairman & Acting Principal is Nuril P.Bhosale.

Contact Us
  • Address: PRAGATKALA MAHAVIDYALAYA 1,
    OUTRAM ROAD, BISHOP HOUSE, MISSION COMPOUND,
    TARAKPUR AHMEDNAGAR,
    MAHARASHTRA 414003
  • Phone: +91 9689965502, 0241-2428489
  • Email: prin.pragatkalanagar@gmail.com
Say Hey

© 2023. «Pragat kala». All right reserved.